रक्तदान कार्य महान
मुंबईमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून आजारी लोकांना रक्ताची कमतरता भेडसावत आहे. परिस्थिती एवढी वाईट आहे कि ऑपरेशन ची ठरलेली वेळ सुद्धा रक्ताच्या कमतरतेमुळे पुढे ढकलण्यात येत आहे. रक्तपेढी आणो केईएम रुग्णालयाकडून पेशंट्सच्या नातेवाईकांना रक्ताची तजवीज करण्यास सांगण्यात येत आहे. रक्ताची कमतरता मुंबईतल्या जवळजवळ प्रत्येक दवाखान्यात आहे. म्हणून पेशंट्स च्या नातेवाईकांना रक्ताच्या सोयीसाठी अनेक दवाखान्यांमध्ये फेऱ्या माराव्या लागत आहेत. प्रशासनानुसार ऑक्टोबर मध्ये येणाऱ्या मोठ्या सुट्ट्यांच्या कालावधीमुळे रक्ताची कमतरता भासत आहे. हि अडचण सोडवण्यासाठी रक्तदान शिबीरे आयोजित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सोबतच लोकांना सुद्धा स्वइच्छेने रक्तदान करण्याचे आवाहन केले आहे.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews